‘ऑनलाइन क्लास’वरून वाद : वडिलांनी तोडला मोबाईल, पत्नीला केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:12 AM2021-07-29T04:12:28+5:302021-07-29T04:12:28+5:30
पुणे : मुलाचे ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष नसून तो टाइमपास करीत असल्याचे पाहून वडिलांचा रागाचा पारा वाढला अन् त्यांनी मुलाच्या ...
पुणे : मुलाचे ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष नसून तो टाइमपास करीत असल्याचे पाहून वडिलांचा रागाचा पारा वाढला अन् त्यांनी मुलाच्या हातातून मोबाईल घेऊन तो पाण्याच्या टबात टाकला. पतीला शांत करण्याचा प्रयत्न केलेल्या पत्नीला रॉडने मारहाण करून कॅरम बोर्ड डोक्यात मारून जबर जखमी केले. हा प्रकार कोंढव्यातील पारगेनगर येथील हिलटॉप बिल्डींगमध्ये २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडला.
याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. या कुटुंबातील ५ वर्षाच्या मुलाचा ऑनलाईन क्लास सुरु होता. त्यावेळी त्याच्या वडिलाने ५ वर्षाच्या मुलाला रागावून ‘‘तू टाईमपास कर रहा है. तुम्हारा पढाई पे ध्यान नही है. मै तेरा मोबाईल फोड डालुंगा’’ असे म्हणून त्याचा मोबाईल बंद करुन खाली टाकला. बाथरुमधील पाण्याचे बकेटमध्ये तोडून नुकसान केले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना शांत रहा असे सांगितल्यावर त्याने पत्नीला हाताने, तोंडावर व नाकावर मारहाण केली.
घराचे खिडकीचे पडद्याचा कर्टन रॉड करून त्या रॉडने पत्नीला बेदम मारहाण केली. घरामध्ये ठेवलेला कॅरम बोर्ड उचलून तिच्या डोक्यात मारून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे तपास करीत आहेत.