बिबवेवाडीत पूर्ववैमनस्यातून वाद; टोळक्याकडून चारचाकी वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 16:11 IST2021-01-13T16:10:47+5:302021-01-13T16:11:17+5:30
दहशत पसरविण्याचा प्रयत्न

बिबवेवाडीत पूर्ववैमनस्यातून वाद; टोळक्याकडून चारचाकी वाहनांची तोडफोड
बिबवेवाडी : बिबवेवाडी येथील नीलकमल सोसायटीत पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीत चारचाकी वाहनांच्या काचा फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ते १५ जणांच्या टोळक्याने बिबवेवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी चार चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून मंगळवारी दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये २ मारुती ओम्नी व २ अल्टो अशा चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाला असून दहशत पसरली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी ४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे.