हॉस्पिटलची तोडफोड
By admin | Published: May 6, 2017 02:27 AM2017-05-06T02:27:00+5:302017-05-06T02:27:00+5:30
अॅपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : अॅपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन कक्षाची ताडफोड करीत गोंधळ घातला. गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी सचिन हडप (वय २२, रा. खोपोली, जि. रायगड) या महिलेला बुधवारी सकाळी अॅपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेसाठी श्रद्धा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी सातला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतर महिलेची प्रकृती खालावत गेली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचारही सुरू केले. मात्र, अखेर दुपारी चारच्या सुमारास उपचारादरम्यान माधुरी हडप यांचा मृत्यू झाला. माधुरी यांच्या या अचानक मृत्यूमुळे संतप्त झालेल्या तिच्या नातेवाइकांनी श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत रिसेप्शन कक्षाची तोडफोड केली. या घटनेची खबर प्राप्त होताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
माधुरी यांना तीन वर्षांचा मुलगा असून अॅपेंडिक्सचा किरकोळ त्रास असणाऱ्या माधुरी यांची तब्येत तंदुरुस्त होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा केवळ डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करीत माधुरी यांच्या नातेवाइकांनी करीत दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी
मागणी केली आहे. लोणावळा पोलिसांनी माधुरी यांचा आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून,
त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर तपासाची दिशा ठरणार आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण करीत आहेत.