... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 09:33 PM2020-09-28T21:33:06+5:302020-09-28T21:54:58+5:30

शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या.

Dissatisfaction among police personnel over Pune transfers; Line for appeal to the Commissioner of Police | ... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त  

... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त  

Next
ठळक मुद्देइतक्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी थेट आयुक्तांसमोर आल्याने एकच चर्चेचा विषय

पुणे : सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियमानुसारच बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही जण नाराज असणार आहेत. काहीचे डिफॉल्ट रिपोर्ट नुसार बदली झाली आहे. ज्या पोलिसांचे खरेच महत्वाचे कारण आहे. त्यांचा विचार केला जाईल.  त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. अन्यथा इतरांना बदलीच्या ठिकाणी जावेच लागेल, असे स्पष्ट संकेत पुणे़ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी दिले. 

पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय व अन्य विभागांमध्ये ६ वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी करणाऱ्या पोलिसांची, तसेच विनंती अर्ज व ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, अशा पोलिसांच्या पोलीस प्रशासनाकडून बदल्या केल्या जातात. गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर १२८९ पोलिसांच्या बदल्यांचा आदेश काढला. या बदल्यामध्ये पोलीस हवालदार ४७६, सहायक फौजदार ६२, पोलीस नाईक ३२३, पोलीस शिपाई ४०८ यांचा समावेश आहे. 

नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी १२८९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र त्यामध्ये मुदतपूर्व बदली व प्रशासकीय बदली झालेल्या काही नाराज पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली बदली रद्द व्हावी, यासाठी सोमवारी पोलीस आयुक्तालयात एकच गर्दी केली होती. शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या. कित्येक वर्षानंतर अशाप्रकारे इतक्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी थेट आयुक्तांसमोर आल्याने एकच चर्चेचा विषय झाला आहे.  
         मुदतपूर्व व प्रशासकीय बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही बदली रद्द करावी, यासाठी सोमवारी सकाळपासून पोलीस आयुक्तालयात एकच गर्दी केली होती. या सर्वांचे म्हणणे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी ऐकून घेतले. त्यात प्रामुख्याने अनेकांनी बदलीचे ठिकाण लांब आहे. वैद्यकीय कारणामुळे बदलीच्या ठिकाणी हजर होणे गैरसोयीचे असल्याची कारणे सांगितली. मंगळवारीही काही कर्मचारी येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
़़़़़़

Web Title: Dissatisfaction among police personnel over Pune transfers; Line for appeal to the Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.