उपमहापौर पदावरून आरपीआय मध्ये नाराजीनाट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 11:58 AM2021-03-16T11:58:30+5:302021-03-16T12:01:31+5:30

आठवले गट विरुद्ध अन्य वाद अखेर रामदास आठवलेंना घालावं लागलं लक्ष आज नियुक्ती होणार का याकडे लक्ष

Dissatisfaction in RPI from the post of Deputy Mayor | उपमहापौर पदावरून आरपीआय मध्ये नाराजीनाट्य

उपमहापौर पदावरून आरपीआय मध्ये नाराजीनाट्य

Next

भाजप ने उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा घेतलेला असला तरी उपमहापौर कोण याचा वाद आरपआय मधला अंतर्गत वाट मिटून नियुक्ती होणार का हे पाहावे लागणार आहे. जवळ्पास दोन महिने ही नियुक्ती रखडलेली असताना आज सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 

 

गेले दोन महिने या पदावरून आरपआय मध्येच वाद सुरु होत. पुण्यात हा निर्णय होऊ न शकल्याने हे नाराजी नाट्य थेट रामदास आठवलेंपर्यंत गेले होते. अखेर आज भाजप ने उपमहापौर पदाचा राजीनामा घेतला आहे. आता निर्णय झाल्याप्रमाणे सुनीता वाडेकर या पदावर नियुक्त होणार की इतर कोणाची वर्णी लागणार हे पहावे लागणार आहे. 

पालिकेच्या उपमहापौरपदावरुन भाजपा आणि आरपीआयमध्ये नाराजीनाट्य रंगलेले होते. महापौर बदलांनातर आरपीआयकडील हे पद भाजपने स्वतःकडे घेतले होते. एक वर्षानंतर पुन्हा आरपीआयचे त्यावर अधिकार सांगायला सुरुवात केली होती. मागील तीन चार महिन्यापासून सुरू असलेलाहा तिढा सोमवारी सुटला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संगण्यावरून उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी राजीनामा दिला. आता हे पद आरपीआयला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पालिकेत भाजपा आरपीआयची सत्ता आल्यांनातर अडीच वर्षे आरपीआयकडे उपमहापौरपद होते. हे पद भाजपाने काढून घेतल्याने आरपीआय पदाधिकाºयांचा आणि भाजपा नेत्यांचा पालिकेत वाद झाला होता. त्यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोनवर पुढील वर्षी आरपीआयला पुन्हा पद देण्याचे आश्वासन दिले होते. आम्हाला विश्वासात न घेता पद कसे काय काढून घेता अशी विचारणा आरपीआयचा नेत्यांनी केली होती. तत्कालीन अध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी हे पद एक वर्षासाठीच असून पुढील वर्षी पुन्हा आरपीआयला संधी दिली जाईल असे स्पष्ट केले होते.

पालिकेत सभागृह नेते बदलण्यात आले. त्यानंतर आरपीआयने उपमहापौरपदाची पुन्हा मागणी केली. भाजपाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर उपमहापौरपदावरुन रिपाईमध्ये (आठवले गट) अल्पसंख्यांक विरुद्ध अन्य असा वाद उफाळून आला होता. उपमहापौरपद पुन्हा रिपाईकडे आल्यामुळे या पदासाठी गटनेत्या सुनीता वाडेकर आणि नगरसेविका फरजाना शेख यांनी इच्छूक होत्या. वारंवार काही ठराविक लोकांनाच पदे मिळत असल्याचा आरोप करीत शेख नाराज झाल्या होत्या. हा वाद थेट पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्यापर्यंत पोचला होता. आठवले यांच्या आदेशानुसार, शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक यांची संयुक्त बैठकीमध्ये सवार्नुमते वाडेकर यांच्या नावाचा ठराव मंजुर करण्यात आला. वाडेकर यांच्या नावाचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरिष बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नवनियुक्त सभागृह नेते गणेश बिडकर यांना पाठविण्यात आले होते.

परंतु, त्यावर मागील तीन महिन्यात कोणताही निर्णय झालेला नव्हता. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेंडगे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. आरपीआयचा नावाची केवळ औपचारिक घोषणा शिल्लक आहे.

Web Title: Dissatisfaction in RPI from the post of Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.