‘भांडारकर’मध्येच ग्रंथसंपदेची जपणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:54 AM2017-07-24T02:54:18+5:302017-07-24T02:54:18+5:30
कुठले पुस्तक दुर्मिळ आहे, हे गोविंद तळवलकर अचूक ओळखत असत. एका विद्वान माणसाने जमविलेली पुस्तके वेगळी असणारच, यात शंका नाही. या ग्रंथसंपदेची
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुठले पुस्तक दुर्मिळ आहे, हे गोविंद तळवलकर अचूक ओळखत असत. एका विद्वान माणसाने जमविलेली पुस्तके वेगळी असणारच, यात शंका नाही. या ग्रंथसंपदेची जपणूक येथेच होऊ शकेल, याची खात्री असल्याने त्यांनी ही ग्रंथसंपदा भांडारकर संस्थेच्या हवाली केली. तळवलकर अमेरिकेत असताना मी या संग्रहाची देखभाल केली. आता आमच्या मैत्रीचा हा कलश मी त्यांच्या गैरहजेरीत संस्थेच्या हवाली करत आहे, असे मत माजी मंत्री विनायक पाटील यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर यांच्या वैयक्तिक संग्रहातील पाच हजार ग्रंथ पाटील यांच्या हस्ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला प्रदान करण्यात आले.
तळवलकर यांच्या ९२व्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर, विश्वस्त राहुल सोलापूरकर, नियामक मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, उपाध्यक्ष हरी नरके, आमदार विजय काळे उपस्थित होते.