तोरणा भागात गरजूंना साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:16+5:302021-07-16T04:10:16+5:30
वेल्हे, मुळशी, भोर तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी ११ जुलै रोजी आदिवासी ...
वेल्हे, मुळशी, भोर तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी ११ जुलै रोजी आदिवासी कुटुंबाना साडी, कपडे, लहान मुलांची खेळणी/कपडे, कातकरी पाड्यांवर जाऊन वाटप करण्यात आले.
निगडे (मोसे), ओसाडे, रुळे, सोनापूर, कुरण, पानशेत आदी गावांत हा उपक्रम राबविला. या वेळी उदय ज्योती फाउंडेशनचे तुषार आडकर, अभिजित चव्हाण, सचिन आडकर, हेमंत घनवट, रोहित नलावडे, उमेश दारवटकर, संकेत येवले, वैभव जागडे, समाधान बनसोडे, अनिकेत खनिवाले, संतोष वरपे, विठ्ठल साळेकर आदी सहभागी झाले होते.
--
फोटो क्रमांक : १५ मार्गासनी निगडे मोसे
फोटोओळी : निगडे मोसे (ता. वेल्हा) उदय ज्योती फाउंडेशनकडून साहित्याचे वाटप करण्यात आले.