निर्यात केंद्रांतून १४ हजार मेट्रिक टन शेतमालाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:58+5:302021-08-14T04:14:58+5:30
पुणे : कोरोना काळातही कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रांमधून १४ हजार ४१५ मेट्रिक टन शेतमालाची हाताळणी केली. यात ...
पुणे : कोरोना काळातही कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रांमधून १४ हजार ४१५ मेट्रिक टन शेतमालाची हाताळणी केली. यात द्राक्ष, आंबा, फळांपासून ते हिरवी मिरची व अन्य भाज्यांचाही समावेश आहे.
कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी ही माहिती दिली. शेतीमालाचे परदेशात व देशांतर्गत बाजारपेठेत वितरण होण्यासाठी पॅकिंगसह अनेक आवश्यक गोष्टी कराव्या लागतात. बाजारपेठा, तेथील दर वगैरेची अद्ययावत माहिती त्यांना द्यावी लागते. त्यासाठी मंडळाने राज्यात ४४ निर्यात सुविधा केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रांचे काम कोरोना काळातही सुरू होते, असे पवार यांनी सांगितले.
केंद्रांमधून युरोप, दुबई, इराण, श्रीलंका, थायलंड, रशिया, इंग्लंड, युरोपियन देश, ऑस्ट्रेलिया, कतार, जपान, सिंगापूर, कॅनडा, अमेरिका, नेदरलँड, जर्मनी व नेपाळ या देशांना निर्यात होते. देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली या राज्यांमध्येही शेतमाल वितरित होतो. मालाची वितरित करण्यापूर्वीची सर्व काळजी सुविधा केंद्राकडून घेतली जाते. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण होतो, अशी माहिती पवार यांनी दिली.