पुणे जिल्ह्यातील कोरोनाकाळात ४७ हजार ८५७ टन मोफत अन्नधान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:07+5:302021-06-19T04:09:07+5:30

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या कठीण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मे ते जून २०२१ पर्यंत जिल्हा अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यामध्ये ...

Distribution of 47,857 tons of free foodgrains during the Corona period in Pune district | पुणे जिल्ह्यातील कोरोनाकाळात ४७ हजार ८५७ टन मोफत अन्नधान्याचे वाटप

पुणे जिल्ह्यातील कोरोनाकाळात ४७ हजार ८५७ टन मोफत अन्नधान्याचे वाटप

googlenewsNext

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या कठीण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मे ते जून २०२१ पर्यंत जिल्हा अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यामध्ये ४७ हजार ८५७.२६ मे. टन मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी सांगितले.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी बेक्र द चेनचे आदेश जारी करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आर्थिक साहाय्य अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने पात्र असलेल्या नागरिकांना हा लाभ देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना १ महिन्याकरिता मोफत गहू व तांदूळ वाटपाबाबत आदेश देण्यात आले होते. तसेच केंद्र शासनाने मे व जून २०२१ करिता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमाह ५ किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येत आहेत. अन्नधान्य वेळेत वितरण करण्यासाठी पुणे शहर व ग्रामीणकरिता नियोजन करण्यात येऊन राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या दोन्ही योजनांचे धान्य वेळेत अन्न महामंडळाच्या गोदामातून घेऊन दोन्ही योजनांचे धान्य प्रत्यक्षात वाटप करणेसाठी स्वस्त धान्य दुकानात पोहोच करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: सर्व तहसीलदारांना सूचना दे‌‌‌ऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांना तत्काळ वाटप करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सर्व तहसीलदार व परिमंडळ अधिकारी यांनी रास्त भाव दुकानदारांच्या बैठका घेऊन लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरणाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून अन्नधान्य वितरणबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Distribution of 47,857 tons of free foodgrains during the Corona period in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.