जिल्हा बँकेकडून खरिपाचे ९२ टक्के पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:29+5:302021-08-26T04:12:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र आतापर्यंत तब्बल एक हजार ६३३ कोटी ३६ लाख ...

Distribution of 92% kharif crop loan from District Bank | जिल्हा बँकेकडून खरिपाचे ९२ टक्के पीक कर्ज वाटप

जिल्हा बँकेकडून खरिपाचे ९२ टक्के पीक कर्ज वाटप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र आतापर्यंत तब्बल एक हजार ६३३ कोटी ३६ लाख रुपयांचे म्हणजेच उद्दिष्टाच्या ९२ टक्के पीक कर्जवाटप पूर्ण केले आहे. पीक कर्जवाटपात पुणे जिल्हा बँक राज्यात आघाडीवर आहे.

नाबार्ड बँकेकडून पुणे जिल्ह्यासाठी दिलेल्या पीक कर्जाच्या एकूण उद्दिष्टापैकी सर्वांत मोठा वाटा पुणे जिल्हा बँकेचा असतो. त्यात जिल्हा बँकेकडून नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने देण्यात येते. शून्य टक्के व्याजाचा लाभ घेण्यासाठी वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असते.

पुणे जिल्हा बँकेला सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात खरीप हंगामासाठी १ हजार ७७९ कोटी ९४ लाख रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. यापैकी जिल्हा बँकेने आतापर्यंत तब्बल २ लाख ८ हजार ६१८ शेतकऱ्यांना १ हजार ६३३ कोटींचे म्हणजेच ९२ टक्के कर्ज वाटप केले आहे. गत वर्षी ऑगस्टपर्यंत केवळ ७९.४७ टक्केच कर्ज वाटप झाले होते.

चौकट

तालुकानिहाय खरीप पीक कर्जाचे वाटप व शेतकरी संख्या

तालुका शेतकरी कर्ज वाटप (कोटीत)

आंबेगाव २०,४८३ १२२.२७.

बारामती १९,९०२ १८०.८४.

भोर १२,०५४ ७७.५७

दौंड १७,३२४ १८५.३५

हवेली ७०७९ ६४.४८

इंदापूर १४,०५५ १५९.५४

जुन्नर ३२,२७५ २३३.५०

खेड ३१,५७३ १६६.४२

मावळ ७०५३ ४३.३४

मुळशी ४४७५ २४.९८

पुरंदर १९,४५९ १३८.०३

शिरूर २०,१५७ २२४.८५

वेल्हा २६९९ १२.१२

एकूण २ लाख ८ हजार ६१८ १६३३.३६

चौकट

शंभर टक्के पीक कर्ज वाटणार

“राज्यात सर्वाधिक पीक कर्ज वाटप करणारी बँक म्हणून पुणे जिल्हा बँकेचा उल्लेख केला जातो. आजही राष्ट्रीयीकृत बँकांकडून केवळ १५-२० टक्केच पीक कर्जाचे वाटप केले जात असताना जिल्हा बँकेने ९२ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. गावा-गावांत जिल्हा बँकेच्या शाखा असल्याने जलद गतीने कर्ज वाटप केले जाते. यंदा खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँक यंदा शंभर टक्के पूर्ण करेल.”

- रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी बँक

Web Title: Distribution of 92% kharif crop loan from District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.