आर्यवैश्य समाज व प्रीतम फाउंडेशनकडून वह्यावाटप उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:05+5:302021-07-01T04:09:05+5:30

गेल्या तीन वर्षांपासून आर्यवैश्य कोमटी समाज आणि प्रीतम फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्याचा उपक्रम सुरू आहे. समाज ...

Distribution activities from Aryavaishya Samaj and Pritam Foundation | आर्यवैश्य समाज व प्रीतम फाउंडेशनकडून वह्यावाटप उपक्रम

आर्यवैश्य समाज व प्रीतम फाउंडेशनकडून वह्यावाटप उपक्रम

Next

गेल्या तीन वर्षांपासून आर्यवैश्य कोमटी समाज आणि प्रीतम फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्याचा उपक्रम सुरू आहे. समाज व फाउंडेशनचे राज्यभर असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत वह्या पुरविण्याचे काम केले जाते. पहिल्या वर्षी सुमारे पंधरा हजार, गतवर्षी वीस हजार, तर यंदा तीस हजार वह्यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती प्रीतम गंजेवार यांनी दिली. यंदा वह्यांच्या मुखपृष्ठावर 'ह.भ.प.पु. ब्रह्मभूषण संतश्रेष्ठ श्रीरंग महाराज' यांचे नाव आणि प्रतिमा असून त्यांच्या आशीर्वादाने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कोणताही अडथळा येऊ नये व उत्तम ज्ञानार्जन त्यांच्याकडून व्हावे, हा उद्देश असल्याचे गजानन गंजेवार यांनी सांगितले.

गतवर्षी सांगली-कोल्हापुरातील महापुरामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाच्या माध्यमातून वह्यांचे वाटप झाले. यंदाही कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक हरपले अशा विद्यार्थ्यांना प्राधान्याने वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी आर्यवैश्य कोमटी समाजाच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधावा त्यांच्यापर्यंत ही मदत पोचविण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुंबईत या वह्यांचे प्रकाशन झाल्यानंतर राज्यभर वह्यावाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

--

फोटो क्रमांक : ३०पुणे वह्यावाटप

फोटो ओळी : आर्यवैश्य कोमटी समाज आणि प्रीतम फाउंडेशनच्या वतीने

Web Title: Distribution activities from Aryavaishya Samaj and Pritam Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.