शंभरहून अधिक दिव्यांगाना कृत्रीम हातपायांच वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:15+5:302021-03-16T04:12:15+5:30
राजगुरूनगर येथे मुंबई माता बाल संगोपन केंद्रातील धर्मदाय रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, रोटरी कळंब राजगुरूनगर, भारत विकास ...
राजगुरूनगर येथे मुंबई माता बाल संगोपन केंद्रातील धर्मदाय रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, रोटरी कळंब राजगुरूनगर, भारत विकास परिषद, मुंबई माता बाल संगोपन केंद्र यांच्या संयुक्त माध्यमातून मोफत पाय हात आणि कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन केले होते. त्याचे उदघाटन पुणे रोटरी मेट्रो क्लबचे अध्यक्ष मकरंद फडके, राजगुरूनगर रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल वाळुंज यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे रोटरी क्लबचे माधव तीळगूळकर, सेक्रेटरी चक्रधर खळदकर, प्रकल्प प्रमुख अविनाश कोहिनकर, गणेश घुमटकर, अजित वाळुंज, जयंत घोरपडे, नरेश हेडा, श्रीकांत गुजराथी, विठ्ठल सांडभोर, संजय कडलग, सुधीर येवले, भारत विकास परिषदेचे जयवंत जेष्ठे, वासुदेव कालरा, विजय गोरे, श्रीकांत बोरगावकर, प्रशांत सातपुते यांच्यासह राज्यभरातुन आलेल्या दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या.
या तपासणी शिबिरात १०१ लाभार्थीची तपासणी करून त्यातील ९२ लाभार्थी निश्चित करण्यात आले.त्यांचे हात व पाय यांचे माप घेऊन त्यांना त्याचे पुढील काही दिवसात मोफत वाटप केले जाणार असल्याची माहिती रोटरी क्लब प्रकल्प प्रमुख अविनाश कोहिनकर, राजगुरूनगर रोटरी क्लब अध्यक्ष राहुल वाळुंज यांनी दिली.
राजगुरूनगर येथे रोटरी क्लबच्या वतीने आयोजित मोफत शिबिरात कृत्रिम पाय देण्यासाठी तपासणी करताना तज्ञ सोबत रोटेरियन्स