खेड -शिवापूर, आणेवाडी टोलनाक्यावरील बोगस पावत्याचे वाटप एक लाखाच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:11+5:302021-03-23T04:10:11+5:30

नाक्यावर ५६ हजार, तर आणेवाडी टोलनाक्यावर ४६ हजार अशा एकूण सुमारे १ लाख २ हजार बनावट पावत्या वाहनांना दिल्याचे ...

Distribution of bogus receipts at Khed-Shivapur, Anewadi toll plaza on one lakh | खेड -शिवापूर, आणेवाडी टोलनाक्यावरील बोगस पावत्याचे वाटप एक लाखाच्यावर

खेड -शिवापूर, आणेवाडी टोलनाक्यावरील बोगस पावत्याचे वाटप एक लाखाच्यावर

Next

नाक्यावर ५६ हजार, तर आणेवाडी टोलनाक्यावर ४६ हजार अशा एकूण सुमारे १ लाख २ हजार बनावट पावत्या वाहनांना दिल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. ११ जणांवर गुन्हे दाखल असुन तीन आरोपी फरार आहेत. सदर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी दिली.

२५ फेब्रुवारीला पुण्यातील एक सजग नागरिक अजित बाबर यांनी बनावट पावत्याबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे तक्रार दिली होती.त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पुणे व राजगड पोलीस यांनी तपास करून बनावट पावत्या प्रकरण उघड करून ११ जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर खेड-शिवापूर व आणेवाडी टोल नाक्यावरील बोगस पावत्यांच्या

रॅकेट प्रकरणी टोल कर्मचाऱ्यांसह टोलचालक तसेच टोल अधिकारी यांचा देखील सहभाग असल्याची शक्यता आहे. सदर प्रकरणाची चौकशी करावी म्हणून खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन केली होती.

दरम्यान, कृती समितीच्या निवेदनानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी याप्रकरणी शासनाची फसवणूक झाल्याची शक्यता असल्यामुळे बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची स्वतंत्र तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली होती.त्याच्या मार्गदशानाखाली राजगड पोलीस तपास करीत असून या प्रकरणात ११ जणांवर गुन्हे दाखल झाले असून तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस यंत्रणेसह राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्याकडुन सदर प्रकरणी स्वतंत्र तपास सुरू आहे.तपास योग्य दिशेने सुरू असून १७ जणांचे जबाब नोंदवले असून पुढील काही दिवसांत महत्त्वाची माहिती समोर येईल या कारवाईतून कोणीही सुटणार नाही.सदर प्रकरणाच्या मास्टर माइन्डला लवकरच शोधून काढू, असे उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले.

Web Title: Distribution of bogus receipts at Khed-Shivapur, Anewadi toll plaza on one lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.