पुरंदर मधील विद्यालयांना पुस्तके आणि हॅन्डवाॅश स्टेशनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:33+5:302021-03-24T04:11:33+5:30
यावेळी आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून विधानपरिषदेचे आमदार वझाहत मिर्झा यांच्या आमदार फंडातून तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांत आवांतर वाचनासाठी ...
यावेळी आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून विधानपरिषदेचे आमदार वझाहत मिर्झा यांच्या आमदार फंडातून तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांत आवांतर वाचनासाठी पुस्तके तर रोटरी क्लबच्या डी जी रश्मी कुलकर्णी यांच्या माध्यमातून पुणे व पुरंदर रोटरी क्लबच्या वतीने प्रत्येकी २२ हजार रुपये किमतीचे आठ हॅन्डवाॅश स्टेशनचे वितरण करण्यात आले. सध्या सोशल मिडीया, इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांचे वाचन संस्कृती कमी होत असताना हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, रोटरीचे उपाध्यक्ष अनिल उरवणे, प्राचार्य नंदकुमार सागर, प्राचार्य हनीफ मुजावर, आत्माराम शिंदे, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले, रामदास शिंदे, रामप्रभू पेटकर, पांडूरंग जाधव, अंबादास कवळे यांसह विविध विद्यालयांचे शिक्षक उपस्थित होते. ईस्माईल सय्यद यांनी सुत्रसंचलन, सुधाकर जगदाळे यांनी प्रास्ताविक केलेे.
--
फोटो २३ सासवड हॅण्डवाश
फोटोओळ :- सासवड येथे पुरंदर मधील विद्यालयांना पुस्तकांचे वाटप करताना आ संजय जगताप
सासवड येथे पुरंदर मधील विद्यालयांना हॅन्डवाॅश स्टेशनचे वाटप प्रसंगी आ संजय जगताप व शिक्षक