वैदू समाजातील दहा जणांना जातीच्या दाखल्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:23+5:302021-07-10T04:08:23+5:30
शिंदे म्हणाले, वैदू समाज भटका आहे. त्यांच्याकडे जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत. ही समस्या सोडविण्यासाठी पुणे व सोलापूर जिल्ह्यात ...
शिंदे म्हणाले, वैदू समाज भटका आहे. त्यांच्याकडे जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत. ही समस्या सोडविण्यासाठी पुणे व सोलापूर जिल्ह्यात समाजाचे मेळावे घेऊन माहिती देण्यात आली. मोठ्या प्रयत्नानंतर कागदपत्रे गोळा होऊ लागली. मात्र तरीही दाखले मिळण्यास लॅाकडाऊनमुळे अडचणी येत होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेण्यात आली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सतत पाठपुरावा केल्याने दाखले मिळण्यास सुरुवात झाली. सोलापूरमधील उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी दाखल्यांसाठी सहकार्य केले.
राज्यात कुठेही जातीच्या दाखल्यासाठी शिबिर घ्यायचे असेल तर संपर्क साधावा असे शिंदे यांनी नमूद केले.
यासाठी नवचेतना संस्था व वैदू विचार मंचचे रामा शिंदे, दुर्गा शिंदे, विनोद पवार, गोविंद शिंदे, चंद्रकांत लोखंडे, विनोद लोखंडे, आकाश शिंदे, बाबासाहेब लोखंडे, महेश लाकडे, अजय जाधव, ॲड. संतोष पवार यांनी प्रयत्न केले.