पालिकेच्या स्वच्छ पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:12 AM2021-02-10T04:12:28+5:302021-02-10T04:12:28+5:30
पालिकेकडे जिंगल्स गटात २०, शॉर्ट फिल्म २०, पोस्टर्स रंगविण्यामध्ये ६६, मुरल्स प्रकारात २१ आणि पथनाट्यासाठी १३ प्रवेशिका आल्या होत्या. ...
पालिकेकडे जिंगल्स गटात २०, शॉर्ट फिल्म २०, पोस्टर्स रंगविण्यामध्ये ६६, मुरल्स प्रकारात २१ आणि पथनाट्यासाठी १३ प्रवेशिका आल्या होत्या. छाननी समितीमधील परीक्षकांनी अंतिम विजेते जाहिर केले होते. त्यांचा सत्कार अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त माधव जगताप, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त आशा राऊत, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, कमिन्स इंडियाच्या अवंती कदम आदी उपस्थित होते. यावेळी विजेत्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
-====
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरात ‘प्लॅगेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये १ हजार ३१५ नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, बचत गटांचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी नदी किनारी स्वच्छता करण्यात आली. भिडे पुलाजवळ सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.