अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:51+5:302021-07-25T04:09:51+5:30

---- पिंपरी सांडस : हवेली तालुक्यातील गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आमदार अशोक पवार यांच्या हस्ते धनादेशाचे ...

Distribution of compensation to farmers affected by heavy rains | अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप

Next

----

पिंपरी सांडस : हवेली तालुक्यातील गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आमदार अशोक पवार यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान दिलासा मिळाला आहे.

अष्टापूर फाटा (ता. हवेली) येथील शिवशंकर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते, राजेंद्र खांदवे, राष्ट्रवादी प्रवक्ता विकास लवांडे, लोचन शिवले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, राजेंद्र टिळेकर, हेमलता बडेकर, प्रदीप कंद, सुभाष टिळेकर, चंद्रकांत वारघडे, कृषी अधिकारी सपना ठाकूर, बाळासाहेब भोरडे, संदीप गोते, सतीश भोरडे, संतोष कांचन, संदीप जगताप उपस्थित होते.

ॲड. अशोक पवार म्हणाले की, शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. तो निस्वार्थपणे शेती करून एका प्रकारची देशसेवाच करीत आहे. परंतु, वारंवार होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला या नुकसानीतून बाहेर काढून सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने त्याला आर्थिक मदत करण्यात आली आहे. हवेली तालुक्यातील १८ गावांमधील तब्बल २५९५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे ७१ लाख ४८ हजार १३७ रुपयांचे धनादेश देण्यात येणार आहेत, असंही पवार या वेळी म्हणाले.

दरम्यान, गतवर्षी जून २०२० ते ऑक्टोबर २०२० मध्ये हवेली तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना शासनाने कृषी आयुक्तालयाला दिल्या होत्या. त्यानुसार हवेली तालुक्यात प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तो अहवाल कृषी आयुक्तालयात सादर केला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येत आहे.

--

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त गावनिहाय शेतकऱ्यांची संख्या (कंसात धनादेशाची रक्कम)

अष्टापूर :- ४०८ (४२१०१६), हिंगणगाव :- ९२ (२४८३८४), न्हावी-सांडस ३३ (४८०४१), सांगवी सांडस ;- ५८ (१०१६६६), वाडेबोल्हाई :-३६९ (३७५०१३), गाडेवाडी १३३ (२३०९४१), मुरकुटेनगर :- २१२ (५२४६७४), शिंदेवाडी :- २८१ (२८७०६७), बुर्केगाव :- १९ (४९६६३), पिंपरी सांडस :- २४६ (५९४५२८), बिवरी :- ९७ (५२२७६९), कोरेगांव मुळ :- ४३ (२०७२११), उरुळी कांचन :- १० (४७७७०), खामगाव टेक :- १९ (४९५६३), भवरापूर :- १६ (६५६३२), कदमवाकवस्ती ४ (१९९०८), लोणीकाळभोर :- २२ (८६०९४), टिळेकरवाडी :-१९१ (२१५७५६३), शिंदेवाडी :- ३४२ (१११०६३४)

--

फोटो क्रमांक : २४ पिंपरी सांडस येथे नुकसानभरपाई धनादेश वाटप.

फोटोच्या ओळी : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेश वाटताना आमदार अशोक पवार.

240721\img20210724163348.jpg

???????????? ??????????? ?????? ???? ?????? ????? ???? ???? ? ??? ???????

Web Title: Distribution of compensation to farmers affected by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.