वेल्ह्यातील २ हजार १३१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:13 AM2021-08-18T04:13:58+5:302021-08-18T04:13:58+5:30
वेल्हे तालुक्यातील भुरुकवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांच्या हस्ते वाटप करण्यात ...
वेल्हे तालुक्यातील भुरुकवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राहुल रेणुसे,शिक्षक शिवाजी बावळेकर, प्रथम संस्थेचे तालुका समन्वयक विकास कांबळे, पालक कविता रेणुसे, संगीता ढेबे, लहु रेणुसे, राजेंद्र रणखांबे, संतोष राजे, प्रथम संस्थेचे अमोल लिम्हण, वर्षा माने आदीसह विद्यार्थी उपस्थित होते. वेल्हे तालुक्यात प्रथम संस्था मुंबई एडुको संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील ७६ शाळांमध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण या उद्देशाने काम करीत असून शाळा व्यवस्थापन समिती,मुलांचे हक्क सुरक्षितता,पालक शिक्षण,गळती झालेली व शाळाबाह्य मुलांना दाखल करणे,अशी कामे केली जात आहे.
फोटो: भुरुकवाडी (ता.वेल्हे) शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.