गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:43+5:302021-06-10T04:08:43+5:30
जिल्हा परिषद शाळेतील दत्तात्रय वाळुंज, नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे या चार शिक्षकांची नावे आहे. मागील तीन वर्षांपासून ...
जिल्हा परिषद शाळेतील दत्तात्रय वाळुंज, नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे या चार शिक्षकांची नावे आहे. मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहेत. सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षात यापूर्वी दत्तक घेतलेल्या ५० मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात येणार आहे. तसेच अजून २५ मुलांना यावर्षी दत्तक घेण्यात येणार असून, असे एकंदरीत ७५ विद्यार्थ्यांना दप्तर, टिफिन, वॉटरबॅग, वह्या, कंपास, कलरबॉक्स, स्केचपेन, पेन, पट्टी, पॅड, छत्री/रेनकोट आदी साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम सन २०१८-१९ पासून राबविण्यात येत असून, दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला याचे वाटप करण्यात येते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मास्क, सॅनिटायझर, हॅंडवॉश यांचेही वाटप सर्व मुलांना करण्यात येणार आहे.
हा उपक्रम राबविताना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळत असल्याचे दत्तात्रय वाळुंज यांनी सांगितले.