ऑफलाइन असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:13+5:302021-07-15T04:10:13+5:30

आर्थिक परिस्थितीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेणेही कठीण जाते. शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते विकास देशमुख ...

Distribution of educational materials to students who are offline | ऑफलाइन असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ऑफलाइन असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Next

आर्थिक परिस्थितीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेणेही कठीण जाते. शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते विकास देशमुख यांच्याकडे मुलांच्या शिक्षणाची व्यथा मांडली. त्यांनी तत्काळ स्वखुशीने येथील सर्व विद्यार्थ्यांना स्वखर्चाने वह्या, पेन, पेन्सिल व पुस्तके शालेय साहित्य उपलब्ध करून दिले.

शिक्षक किरण शिंगडे यांनी कोरोनाचे नियम पाळून सर्व विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. या वेळी उज्ज्वला देशमुख, सुवर्णा पठारे व पार्वती शिरसाट हे पालक उपस्थित होते. पठारवाडी शाळेतील विविध उपक्रम व शैक्षणिक वातावरण पाहून देशमुख यांच्यासह अनेक पालकांनी यंदा आपल्या पाल्यांना येथील शाळेत प्रवेश घेतला आहे.

--

फोटो क्रमांक :

फोटो - पठारवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देताना.

Web Title: Distribution of educational materials to students who are offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.