नाभिक महामंडळाच्या वतीने नाभिक बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:51+5:302021-05-20T04:11:51+5:30
पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात सहा ते सात महिने सलून दुकाने बंद होते. त्यामुळे नाभिक समाज आर्थिकदृष्ट्या पिचलेला होता. दुसऱ्या लाॅकडाऊनमध्येही ...
पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात सहा ते सात महिने सलून दुकाने बंद होते. त्यामुळे नाभिक समाज आर्थिकदृष्ट्या पिचलेला होता. दुसऱ्या लाॅकडाऊनमध्येही नाभिक समाजाची अवस्था बिकट झाली आहे. कोठेही कोणतीही मदत मिळत नाही. पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे युवाध्यक्ष भारत मोरे यांनी दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले. अनेक जण मदतीसाठी पुढे आले.
पुणे जिल्हा युवा अध्यक्ष भारत मोरे, पुरंदर तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष राहुल मगर, सचिव तुकाराम भागवत, उपाध्यक्ष सागर इभाड, माजी सरपंच नवनाथ मोरे, विजय बापू राऊत, विभागप्रमुख अभिजित सूर्यवंशी यांनी यांनी तालुक्यातील अनेक गावी जाऊन गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
--
फोटो क्रमांक : १९ जेजुरी महामंडळ नाभिक समाज
फोटो ओळी : पुणे जिल्हा युवा नाभिक महामंडळाच्या वतीने जेजुरी येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना पदाधिकारी.