आश्रमशाळेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:56+5:302021-08-19T04:14:56+5:30
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून प्रत्येकी चार हजार रुपयांचे खावटी अनुदान दिले जाते. यामध्ये दोन हजार रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे ...
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून प्रत्येकी चार हजार रुपयांचे खावटी अनुदान दिले जाते. यामध्ये दोन हजार रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट व दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. टाळेबंदीच्या काळात आदिवासींच्या अर्थांजनाची अडचण लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने ही योजना आखली आहे. कोहिंडे खुर्द, तोरणे खुर्द व वेल्हावळे येथील कुटुंबांना आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते खावटी किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सहसंचालक,आदिवासी प्रशिक्षण संस्था पुणे तथा प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे, माजी जि. प.सदस्य अरुण चांभारे, माजी सभापती सुरेश शिंदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग, नवनाथ भवारी, खेड तालुका खावटी समन्वयक अधिकारी गणेश गावडे, कृ.उ.बाजार समितीच्या माजी उपसभापती सुगंधा शिंदे, सरपंच नकुशा शिंदे, माजी सरपंच विजय खंडागळे, कचरू शिंदे, ज्योती सावंत, मंगल तांबेकर, सुभाष मोहन उपस्थित होते.