भामचंद्र डोंगरावर शिवलिंगाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना फराळ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:52+5:302021-03-13T04:17:52+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद होते. तरीही काही लोकांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी उंच डोंगराची चढण चढत शिवलिंगाचे दर्शन घेतले.यावेळी वासुली ...

Distribution of Faral to devotees who have come to see Shivlinga on Bhamchandra mountain | भामचंद्र डोंगरावर शिवलिंगाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना फराळ वाटप

भामचंद्र डोंगरावर शिवलिंगाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना फराळ वाटप

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद होते. तरीही काही लोकांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी उंच डोंगराची चढण चढत शिवलिंगाचे दर्शन घेतले.यावेळी वासुली येथील शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाचपुते यांनी स्वर्गीय काळूरामअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने जे काही भाविक उपस्थितीत होते. त्यांना उपवासाच्या निमित्ताने केळी व खिचडी वाटप करण्यात आली.

भीमाशंकरप्रमाणे भामचंद्र डोंगरावर महादेवाचे पुरातन व शिवलिंग आहे. शिवरात्रीला व श्रावण महिन्यात येथील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या अलोट गर्दी लोटत असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी गर्दी केली नाही. युवा उद्योजक चेतन पाचपुते, रामेश्वर पारेख, युवराज पानमंद, अर्जुन पानमंद आदींनी भाविकांची व्यवस्था केली.

११ आंबेठाण

भामचंद्र डोंगर येथे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of Faral to devotees who have come to see Shivlinga on Bhamchandra mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.