विद्यार्थ्यांना पाचशे फळझाडांचे वाटप
By admin | Published: June 30, 2016 02:01 AM2016-06-30T02:01:02+5:302016-06-30T13:18:41+5:30
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामसंसाधन गटाची कार्यशाळा बेबडोहोळ येथील जोतिबा विद्यालयात संपन्न झाली.
चांदखेड : ‘आपला गाव, आपला विकास’ या उपक्रमांतर्गत बेबडोहोळ, धामणे, शिवणे व परंदवडी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामसंसाधन गटाची कार्यशाळा बेबडोहोळ येथील जोतिबा विद्यालयात संपन्न झाली. विद्यार्थ्यांना ५०० फळझाडांचे वाटप करण्यात आले.
मार्गदर्शन करण्यासाठी गटविकास अधिकारी नीलेश काळे, सहायक गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी अनिल यादव , एम. एम. कांबळे, विस्तार अधिकारी एम. एच. पाटील उपस्थित होते.
ग्रामपंचायतने वार्षिक व पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्यासाठी पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. बेबडोहोळ ग्रामपंचायत कार्यालय व विद्यालयासमोर काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. बेबडोहोळ ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांना ५०० फळझाडांचे वाटप झाले. सरपंच सुषमा गायकवाड, उपसरपंच महेंद्र घारे, ग्रामसेवक देशमुख, ग्रामपंचायत सदस्य कांतिलाल गराडे, सतीश घारे, प्रमोद शिंदे, अमोल पिंगळे,भारती बारमुख, सुनीता घारे, कल्पना गराडे, अविनाश गराडे, मुख्याध्यापक क्षीरसागर, राजेंद्र देशमुख आदींनी सहकार्य केले.
देहूत वृक्षारोपण
देहूगाव : महाराष्ट्र शासनाच्या दोन कोटी झाडे लावण्याच्या प्रकल्पांतर्गत येथे वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते येथे वृक्षारोपण करण्यात आले. विकास आराखड्यांतर्गत
तयार करण्यात बाह्यवळण रस्ता १.१च्या कडेला वृक्षारोपण
करण्यात आले. या कार्यक्रामाचे आयोजन महसूल विभाग, पोलीस व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
प्रातांधिकारी स्नेहल बर्गे, सरपंच हेमा मोरे, उपसरपंच सचिन साळुंके, जयश्री जाधव, तहसीलदार किरणकुमार काकडे, मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, उपनिरीक्षक आदिनाथ महानवर, कांतिलाल काळोखे, संदीप शिंदे, भरत
हगवणे, कनिष्ठ अभियंता
ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर उपस्थित होते. (वार्ताहर)
सामाजिक संघटनांकडून संगोपनाची जबाबदारी
कामशेत : मावळ तालुक्यातील आढले, डोणे, दिवाड, राजेवाडी, ओवळे आदी गावांमध्ये सात विविध सामाजिक संघटनांच्या चारशे-पाचशे कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन वृक्षारोपण केले. या संघटनांच्या वतीने
एकाच दिवशी सर्व कार्यकर्त्यांची विभागणी करून मावळात असलेल्या अनेक गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंदिरे, सार्वजनिक जागा व वन विभागाच्या जागांवर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात मावळ तालुका युवक एकता मंच, निसर्गराजा ग्रुप, भक्ती-शक्ती सामाजिक संघटना, मावळ ज्ञान प्रबोधनी व भैरवनाथ सेवा प्रतिष्ठान या संघटनांनी सहभाग घेतला. युवक व ग्रामस्थांनी वृक्ष लागवड करण्याकरिता सहकार्य करताना संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. भाजपाचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, भाजयुमोचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, माजी तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी मार्गदर्शन केले.