नानगाव येथे महिलांना सवलतीच्या दरात पीठगिरणी व वॉटर फिल्टरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:20 AM2021-03-13T04:20:22+5:302021-03-13T04:20:22+5:30
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राणी शेळके म्हणाल्या की ,ॲमेझॉन वरती महिला बचत गटाने तयार विक्री करण्याची सुरुवात दौंड ...
यावेळी
जिल्हा परिषद सदस्य राणी शेळके म्हणाल्या की ,ॲमेझॉन वरती महिला बचत गटाने तयार विक्री करण्याची सुरुवात दौंड तालुक्यातील होत आहे. कौशल्य आत्मसात करा. महिलासाठी भविष्यकाळ उज्वल आहे. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कतृत्ववान महिलांचे कौतुक केले .पक्ष कार्यकर्त्यांना कानपिचक्या देताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी संघटनेच्या माध्यमातून सर्व एकत्र आले तर दौंड मध्ये विधानसभा फार काही अवघड नाही. जिकडे खोबरे तिकडे चांगभलं अशी आमची भूमिका नाही. दौंड नेतृत्व बदला. पुन्हा पुन्हा तीच चूक करू नका. भविष्यात चूक दुरुस्त करा.
यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, वरवंड सरपंच मीना दिवेकर, सभापती हेमलता फडके, उपसभापती सयाजी ताकवणे, चंद्रकांत खळदकर, विश्वास भोसले, वंदना मोहिते, तुषार थोरात, आश्लेषा शेलार, ऐश्वर्या गव्हाणे, दिलीप हंडाळ, विशाल शेलार, पुजा बुट्टे, नंदकिशोर शेलार, कुलदीप गुंड, नानासाहेब रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. निर्जला गुंड यांनी प्रास्ताविक केले.