गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य व किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:39+5:302021-06-19T04:08:39+5:30
किटमध्ये दहा किलो तांदूळ, दहा किलो पीठ, तूरडाळ, मूगडाळ, सोयाबीन, मीठ, साखर, चहा पावडर, २ किलो गोडतेल ...
किटमध्ये दहा किलो तांदूळ, दहा किलो पीठ, तूरडाळ, मूगडाळ, सोयाबीन, मीठ, साखर, चहा पावडर, २ किलो गोडतेल अशा विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. यावेळी अनुराग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय काटम, सचिव सुनिता काटम, सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे व्यवस्थापक हरीश वैद्य, इपशिता दास, सरपंच समीर दोरगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके, ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, साक्षी काटम, अनुराग काटम उपस्थित होते. उर्वरित कुटुंबांना देखील मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अनुराग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष विजय काटम व सचिव सुनीता काटम यांनी सांगितले.
यवत येथील अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट व सेव्ह द चिल्ड्रन संस्था , पुणे यांच्या मदतीने अन्नधान्य व किराणा किट वाटप करताना सरपंच समीर दोरगे, गणेश शेळके, विजय काटम, सुनीता काटम, हरीश वैद्य, इपशिता दास आदी मान्यवर.