महुडेत अन्नधान्य व मास्क वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:51+5:302021-05-18T04:11:51+5:30
गावातील अत्यंत गरीब असणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येकी एक असे वीस किटचे वाटप केले ...
गावातील अत्यंत गरीब असणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येकी एक असे वीस किटचे वाटप केले आहे. यामुळे या कुटुंबांना थोडासा हातभार लागला आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमणाचा धोका अधिक वाढला आहे. अशावेळी मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे अत्यंत गरजेचे आहे. इंगवली गावात करोनाचा जास्त प्रसार होऊ नये याची दक्षता घेत गावच्या सरपंच सारिका बांदल यांनी गावात घरोघरी जाऊन मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी राजगड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक निखिल मगदूम व गावातील सामाजिक कार्यकर्ते वसंत बांदल, सरपंच सारिका बांदल, राजेंद्र बांदल, विजय बांदल, पोलीस पाटील अमित कांबळे, सदस्य समीर काळाने, मंगेश कारभळ, सरपंच तुकाराम कारभळ, विष्णू कारभळ, आनंदा पवार, मोहन किन्हाळे, बळीराम किन्हाळे, मनोहर कोंडके, संदीप काळाणे, प्रशांत बांदल आदी उपस्थित होते.
--़
फोटो क्रमांक : १७ महुडे जिवनावश्यक वस्तू
फोटो - इंगवली (ता. भोर) येथे वाटप करताना बांदल