भोर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने धान्य किट, कंदील, औषधांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:09 AM2021-07-31T04:09:57+5:302021-07-31T04:09:57+5:30

अतिवृष्टीमुळे भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पांगारी धारमंडप रस्त्यावरील कुंड, राजिवडी व शिळींब गावातील लोकांना धान्याचे किट, वीज नसल्याने उजेडासाठी ...

Distribution of food kits, lanterns, medicines on behalf of Bhor Education Society | भोर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने धान्य किट, कंदील, औषधांचे वाटप

भोर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने धान्य किट, कंदील, औषधांचे वाटप

googlenewsNext

अतिवृष्टीमुळे भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पांगारी धारमंडप रस्त्यावरील कुंड, राजिवडी व शिळींब गावातील लोकांना धान्याचे किट, वीज नसल्याने उजेडासाठी कंदील व औषधांचे किट वाटप करण्यात आले.

भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेशराजे पंतसचिव व गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन प्रमोद गुजर,सचिव विकास मांढरे,संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुरेश शहा व सुभाष तरुण मंडळ मंगळवार पेठ भोर यांच्या संयुक्त विद्यमाने वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुरेश शहा, राजेश गुजर, अक्षय मांढरे, रा. र. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एस. ताकवले, मूकबधिरचे एस. एम. जाधव, पसुरेचे ए. एस. वीर, बारे म्हाळवडीचे ए. पी देशमाने,रायरीचे डी ए शिवतारे,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिळीब राजिवडी गावात कंदीलवाटप करताना भोर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व शिक्षक. फोटो.

Web Title: Distribution of food kits, lanterns, medicines on behalf of Bhor Education Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.