यवतमधील ३०० कुटुंबांना धान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:51+5:302021-04-30T04:13:51+5:30
कोरोना आजाराच्या साथीमुळे लॉक डाउन मध्ये अनेक उदयोग धंद्यांना फटका बसला आहे.अनेकांचा रोजगार यामुळे हिरावला असून अशा कुटुंबांना मदतीची ...
कोरोना आजाराच्या साथीमुळे लॉक डाउन मध्ये अनेक उदयोग धंद्यांना फटका बसला आहे.अनेकांचा रोजगार यामुळे हिरावला असून अशा कुटुंबांना मदतीची गरज आहे. माजी उपसरपंच सदानंद दोरगे यांनी सामाजिक बांधिलकीचा विचार करून अशा कुटुंबाना मदतीचा हात देऊ केला आहे.
माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते गरीब कुटुंबाना धान्य वाटपाची सुरुवात केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम , माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड , ह.भ.प.सोनबा कुदळे , ग्रामपंचायत सदस्य सुजाता कुदळे , दौंड तालुका समता परिषदेचे कार्याध्यक्ष मंगेश रायकर, आण्णा दोरगे, दादा माने, रोहन दोरगे आदी उपस्थित होते. इंदिरानगर झोपडपट्टी भागात सुमारे ३०० कुटुंबे आहेत.त्यांना मदतीचा हात सदानंद दोरगे यांनी देऊ केला.
२९ यवत वाटप
यवत (इंदिरानगर) येथे गरीब कुटुंबांना धान्य वाटप करताना रमेश थोरात , सदानंद दोरगे व इतर