नीरेत राष्ट्रवादीच्या वतीने ८०० गरजूंना अन्नधान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:58+5:302021-06-04T04:09:58+5:30

राधाकृष्ण मंगल कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात पाच गरजूंना कोरोनाचे नियम पाळत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते किट ...

Distribution of foodgrains to 800 needy people on behalf of NCP in Niret | नीरेत राष्ट्रवादीच्या वतीने ८०० गरजूंना अन्नधान्याचे वाटप

नीरेत राष्ट्रवादीच्या वतीने ८०० गरजूंना अन्नधान्याचे वाटप

Next

राधाकृष्ण मंगल कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात पाच गरजूंना कोरोनाचे नियम पाळत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते किट वितरण करण्याचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित केला होता.

या वेळी तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, माजी आमदार अशोक टेकवडे, विजय कोलते, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, दत्ताजीराव चव्हाण, उपाध्यक्ष भय्यासाहेब खाटपे, जयदीप बारभाई, राजेश चव्हाण, अजिंक्य टेकवडे, पुष्कर जाधव, संदेश पवार, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक आदी उपस्थित होते.

नीरा येथील नव्याने नियुक्त झालेल्या कार्यकर्त्यांनी या किट वाटपाचे नियोजन केले होते. नीरा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रमोद काकडे, रा.कॉं. तालुका युवक उपाध्यक्ष सुनील जाधव, सुनील पाटोळे, विष्णू गडदरे, नीरा शहर रा.काँ. युवक अध्यक्ष ऋषिकेश धायगुडे, नीरा शहर महिला रा.काँ अध्यक्ष तनुजा शहा, नीरा शहर उपाध्यक्ष अजय राऊत, राहुल मोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँ. नीरा शहर अध्यक्ष कामेश जावळे, उमेश चव्हाण, विष्णू गडदरे, जयदीप पवार, संजय दगडे, महेश धायगुडे, मुन्नाभाई मुलाणी, संतोष मोहिते, संजय चव्हाण, जहीद डांगे, प्रकाश शिंदे, कामेश जावळे, राजू देसाई व सोशल मीडिया अध्यक्ष नीरा-कोळविहीरे अध्यक्ष अनिकेत सोनवणे यांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला शहर अध्यक्ष तनुजा शहा यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद काकडे यांनी केले.

--

फोटो क्रमांक : ०३ नीरा अन्नधान्य वाटप

फोटोओळ : अन्नधान्य वाटप करताना प्रदिप गारटकर, अशोक टेकवडे, प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे पाटील

Web Title: Distribution of foodgrains to 800 needy people on behalf of NCP in Niret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.