भूमिहीन आदिवासी कुटुंबीयांना धान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:59+5:302021-05-24T04:10:59+5:30
कुकॉइन कंपनीच्या सहकार्याने व आदिम संस्था यांच्या स्थानिक संयोजनातून या वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी बी. डी. ...
कुकॉइन कंपनीच्या सहकार्याने व आदिम संस्था यांच्या स्थानिक संयोजनातून या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या वेळी बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव व घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते. जीवनावश्यक साहित्यात धान्ये, डाळी, कडधान्ये, तेल, मसाले, गूळ, शेंगदाणे असे साहित्य देण्यात आले. हे किट उपलब्ध व्हावे, याकरिता कुकॉइन कंपनीचे सतीश खंदारे, पंकज जाधव, मयूर चव्हाण यांनी पुढाकार घेतला. तर सामाजिक कार्यकर्ते शैलेश डिखळे, विनोद शेंडे व कृष्णा बाजारे, डॉ. अमोल वाघमारे आदीम संस्थेचे राजू घोडे, अशोक पेकारी, अशोक जोशी, अविनाश गवारी, दत्ता गिरंगे, अनिल सुपे यांनी या वस्तू गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी काम केले.
फोटो : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना संस्थेचे कार्यकर्ते. (छायाचित्र-कांताराम भवारी)