नारायणगाव उर्दू शाळेत मोफत पुस्तक वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:36+5:302021-09-24T04:12:36+5:30
यावेळी पंचायत समितीच्या सदस्या अर्चना माळवदकर, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी शब्बीर शेख, माजी उपसरपंच आशिष माळवदकर, आरिफ ...
यावेळी पंचायत समितीच्या सदस्या अर्चना माळवदकर, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी शब्बीर शेख, माजी उपसरपंच आशिष माळवदकर, आरिफ आतार, आझम कॅम्पस पुणेचे आय.टी. विभाग प्रमुख आमीन शेख, तरन्नुम शेख, एजाज आतार, मेहबूब काझी इ. मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षणाला पालक-विद्यार्थी कंटाळले असून लवकरात लवकर शाळा सुरू व्हाव्यात असे सर्वांना वाटते आहे. पाठ्यपुस्तके सर्वांना मिळाल्यामुळे आता विद्यार्थी व पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे असे मत शिक्षण विस्तार अधिकारी शब्बीर शेख यांनी व्यक्त केले. यावेळी उर्दू शाळा व्यवस्थापन समिती आणि मुस्लीम समाज नारायणगाव यांच्या वतीने पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मेहबूब काझी यांनी केले व सूत्रसंचालन अकील शेख यांनी केले. इरफान खान यांनी आभार मानले.
Photo नारायणगाव येथील उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.