आळंदीतील वारकरी साधकांना मोफत अन्नधान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:10+5:302021-05-07T04:10:10+5:30
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत आळंदीत कीर्तन, प्रवचन तसेच शालेय शिक्षणासह वारकरी ...
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत आळंदीत कीर्तन, प्रवचन तसेच शालेय शिक्षणासह वारकरी सांप्रदायिक शिक्षणासाठी आलेल्या अडीचशे वारकरी विद्यार्थ्यांना सुमारे एक महिना पुरेल इतके अन्नधान्य व किराणा साहित्य सुपूर्द केले.
वारकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ अद्यापक शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी मुख्याधिकारी अंकुश जाधव, प्रसाद शिंगोटे, वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, सचिव नाना महाराज चंदिले, विश्वस्त अप्पाबुवा पाटील महाराज, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गोपनीय विभागाचे मच्छिन्द्र शेंडे, जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, अर्जुन मेदनकर, उल्हास सूर्यवंशी, माणिक मुखेकर शास्त्री, व्यवस्थापक तुकाराम मुळीक, उमेश बागडे, अर्जुन बिराजदार, योगेश साळुंके, भीमसेन शिंदे, राजेंद्र होन्नर आदींसह साधक वारकरी उपस्थित होते.
दरम्यान वारकरी शिक्षण संस्थेने कोरोना महामारीचे संकटात राज्य शासनास मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक लाख रुपयांचा धनादेश आमदार दिलीप मोहिते - पाटील यांचे हस्ते पुण्याचे पालक मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत वारकरी साधकांना मोफत अन्नधान्य व साहित्यांचे वाटप करताना मान्यवर.