चौफुला येथे सहाशे दिव्यांगांना वस्तूचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:03+5:302020-12-14T04:27:03+5:30

या शिबिरामध्ये अस्थिव्यंग किंवा नेञव्यंग असलेल्या नागरिकांची तपासणी, अपंगत्व प्रमाणपत्र तसेच एस.टी. प्रवास सवलतीसाठी आवश्यक कार्ड नोंदणीची व्यवस्था करण्यात ...

Distribution of goods to 600 persons with disabilities at Chaufula | चौफुला येथे सहाशे दिव्यांगांना वस्तूचे वाटप

चौफुला येथे सहाशे दिव्यांगांना वस्तूचे वाटप

Next

या शिबिरामध्ये अस्थिव्यंग किंवा नेञव्यंग असलेल्या नागरिकांची तपासणी, अपंगत्व प्रमाणपत्र तसेच एस.टी. प्रवास सवलतीसाठी आवश्यक कार्ड नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती .

दिव्यांगांना आवश्यक व्हील चेअर, क्लचेस , चष्मे, कॅलिपर्स, जयपुर फूट देण्यात आले.

यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल,आनंद थोरात,नामदेव बारवकर, कांचन कुल, माऊली ताकवणे, गोरख दिवेकर ,धनाजी शेळके, शिवाजी दिवेकर, संजय दिवेकर , धर्मेंद्र सातव , संजय मोकल, बाळासो नानवर ,अरुणराव आटोळे, ,लक्ष्मण रांधवण,जयदिप सोडनवर , सोमनाथ गडधे ,विकास शेलार आदी उपस्थित होते.

मेळाव्यासाठी सहकार्य करणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, डॉ. शशिकांत ईरवाडकर, डॉ. सुरेखा पोळ तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे मिसाळ, बाळासाहेब नानवर आदींचे आभार मानले.

१३ केडगाव

चौफुला येथे दिव्यांग मेळाव्यात उपस्थित राहूल कुल , कांचन कुल व मान्यवर

Web Title: Distribution of goods to 600 persons with disabilities at Chaufula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.