अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत ८ अ उताऱ्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:04+5:302021-02-06T04:18:04+5:30
अतिक्रमणधारकांना हक्काचे घर मिळावे, अतिक्रमणाच्या नोंदी व्हाव्यात यासाठी अतिक्रमणधारक, संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. वेळप्रसंगी आंदोलने ...
अतिक्रमणधारकांना हक्काचे घर मिळावे, अतिक्रमणाच्या नोंदी व्हाव्यात यासाठी अतिक्रमणधारक, संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. वेळप्रसंगी आंदोलने देखील झाली. वाघोलीचा समावेश पुणे महापालिकेत होणार असल्याने अतिक्रमणधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मासिक सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करण्यात आली. नोंद झाल्यानंतर बहुतांश अतिक्रमणधारकांनी टॅक्सदेखील भरला आहे. त्यानुसार अतिक्रमणधारकांना ८ अ उताऱ्याचे वाटप वाघेश्वरनगर येथे करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, उपसरपंच महेंद्र भाडळे, ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे, रोहिणी गोरे, सुधीर भाडळे, समीर भाडळे, सागर गोरे, सुनील जाधवराव, बाळासाहेब सातव, संदीप थोरात यांच्यासह गायरान क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.