वीर-भिवडी गणातील दिव्यांगांना किराणा मालाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:10 AM2021-05-25T04:10:51+5:302021-05-25T04:10:51+5:30
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक ...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव व वीर-भिवडी गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेश राऊत, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांच्या हस्ते किराणा मालाचे वाटप झाले. यावेळी सरपंच ऋतुजा जाधव, उपसरपंच दत्तात्रय राऊत, ग्रामपंचायत सदस्य शैला जाधव, सुजाता दुधाळ उपस्थित होत्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली असल्याने सर्वसामान्य माणसाला जीवन जगताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे, अशा परिस्थितीत दिव्यांग बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आला असून पुरंदर तालुक्यातील पंधराशे अपंग बांधवांना पंधरा दिवस पुरेल इतक्या किराणामाल साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याचे महेश राऊत यांनी सांगितले.
परिंचे गावातील ३० अपंग बांधवांना याचा लाभ मिळाला असून वीर-भिवडी जिल्हा परिषद गटातील ४८६ अपंग बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गावात हा उपक्रम राबविला असल्याचे पुष्कराज जाधव यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच समीर जाधव, श्रीपाद गुरव,पराग जाधव, स्वप्नील जाधव, शामकांत जाधव, महेश नवले, शांताराम घारमळकर, सचिन जाधव, गणेश जाधव, लोकेश कुंभार, अपंग विकास संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल बनकर, सत्यजित श्रीकांत जाधव, रामचंद्र बाजीराव राऊत, अर्थव श्रीकृष्ण वाघोले, महेश रामचंद्र राऊत, सोनाली जाधव, रमेश रामचंद्र चौधरी आदी अपंग बांधव उपस्थित होते.
--
फोटो : २४ परिंचे किराणा माला
फोटो क्रमांक : फोटो ओळ-परिंचे (ता.पुरंदर) येथे अपंग बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.