यवत येथे गरजूंना किराणा किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:07+5:302021-06-10T04:09:07+5:30
मागील काही वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यवत पंचक्रोशीतील श्रीकाळभैरवनाथ दिंडी सहभागी होत असते. मागील वर्षी आषाढी पालखी ...
मागील काही वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यवत पंचक्रोशीतील श्रीकाळभैरवनाथ दिंडी सहभागी होत असते. मागील वर्षी आषाढी पालखी सोहळा रद्द झाला.यामुळे वारकरी बांधवांची वारी चुकली होती. गोरगरीब कुटुंबांचे कोरोनामुळे मोठे हाल झाले आहेत. अडचणीतील कुटुंबांना मदत करण्याची संकल्पना श्री काळभैरवनाथ दिंडीने मांडली.
दिंडी अध्यक्ष ह.भ.प बबन दोरगे, दिंडी चालक हभप खंडु दोरगे यांनी गरिबांना अन्नधान्य व किराणा किट वाटण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उपक्रमाला गावात असलेल्या कंपन्या व व्यावसायिकांनी देखील मदत दिली. अनुराज शुगर्स , प्रवीण मसाले , दिलीप भोसले, संभाजी दोरगे (नवनाथ ट्रान्सपोर्ट, यवत) , संदीप दोरगे (श्रीदत्त ट्रान्सपोर्ट यवत) , माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड यांच्या सहकार्याने २५० गरीब कुटुंबाना किराणा किट वाटप करण्यात आले.
यावेळी प्रवीण कंपनीचे अधिकारी
नेरकर , जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम
माजी उपसरपंच सदानंद दोरगे , दिंडी अध्यक्ष, चालक, सचिव, संचालक , ह.भ.प. दीपक मोटे ह.भ.प सोनबा कुदळे, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलीक खुटवड, आण्णा दोरगे, साजीद सय्यद,
रामभाऊ कुदळे , भुपेंद्र शहा , शिवाजी जाधव उपस्थित होते.
०९ यवत वाटप
यवत येथे गरजू कुटुंबांना अन्नधान्य व किराणा किट वाटप करताना गणेश कदम , कुंडलिक खुटवड , सदानंद दोरगे व इतर.