महावीर जयंतीनिमित्त आरोग्य साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:09 AM2021-04-26T04:09:15+5:302021-04-26T04:09:15+5:30

यावेळी संघपती भरत चोरडिया, प्रशांत संचेती, प्रकाश बाफणा, अनिल बोरा, सुनील बोरा, कपिल बोरा, अतिष बोरा, प्रीतेश कोठारी, अजित ...

Distribution of health materials on the occasion of Mahavir Jayanti | महावीर जयंतीनिमित्त आरोग्य साहित्य वाटप

महावीर जयंतीनिमित्त आरोग्य साहित्य वाटप

Next

यावेळी संघपती भरत चोरडिया, प्रशांत संचेती, प्रकाश बाफणा, अनिल बोरा, सुनील बोरा, कपिल बोरा, अतिष बोरा, प्रीतेश कोठारी, अजित ओस्तवाल, दिनेश बोथरा, हर्षद ओस्तवाल ,नगर परिषद स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, मनोज अहिरे उपस्थित होते.

भरत चोरडीया म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात शिरूर नगरपरिषदेचे कर्मचारी हे शहराची स्वच्छता करण्याचे, कचरा उचलण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत. वेगवेगळ्या प्रभागातून दवाखाने व घरगुती तसेच इतर ठिकाणचा कचरा गोळा करण्याचे काम सातत्याने गेली १३ महिने न थकता व स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत हे काम करत आहेत. त्यांना रोजच मास्क, सॅनिटायझर, तसेच चांगल्या दर्जा चे हॅंडग्लोव्हज् लागतात. या कर्मचाऱ्यांची

आरोग्याच्या दृष्टीने

दखल घेत जैन युवा परिषदेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करून साहित्य वाटप करण्याचा उपक्रम घेतला असून सामाजिक बांधिलकी जपत या पुढेही असे उपक्रम राबविण्यात येतील.

२५ शिरुर वाटप

नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य साहित्य देताना भरत चोरडिया व इतर.

Web Title: Distribution of health materials on the occasion of Mahavir Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.