एसटी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:45+5:302020-12-08T04:09:45+5:30
कार्यक्रम प्रसंगी आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जि.प.सदस्य बाबाजी काळे, आगार व्यवस्थापक रमेश हांडे, तालुकाध्यक्ष कैलासराव ...
कार्यक्रम प्रसंगी आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जि.प.सदस्य बाबाजी काळे, आगार व्यवस्थापक रमेश हांडे, तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर, शहराध्यक्ष सुभाष होले,दिलिप तापकीर, संगीता फुंदे, अरुणाताई घुले, प्रा.सोनबा फुंदे, मनोज केंगले,आदिसह एस.टी.कामगार,कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.
कोरोना काळात सर्वत्र लाँकडाऊन मध्ये अनेक सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन समाजातील वंचित घटकांना सर्वोतोपरी मदत केली. मात्र एस.टी.चा कर्मचारी आज करोनाच्या प्रादुर्भाव असताना जनतेची सेवा करत असताना अशा दुर्लक्षित वंचित कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या द्रूष्टीने पन्नास हजारांचे साहित्य स्वखर्चातुन देणा-या प्राथमिक शिक्षक महादेव भागुजी फुंदे यांच्या योगदानाचा आदर्श इतरांनाही घेतला पाहिजे असे गौरवोद्गार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
फोटो
०७ राजगुरुनगर
आरोग्य साहित्य वाटपाप्रसंगी बोलताना आमदार दिलिप मोहिते पाटील.