कदमवाकवस्तीत विमाकवच कार्डचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:04+5:302021-06-29T04:09:04+5:30
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली. महामारीच्या काळात या योजनेत कोरोनाचा ...
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली. महामारीच्या काळात या योजनेत कोरोनाचा उपचार होणार असल्याने रुग्णांसाठी मोठी संजीवनी ठरणार आहे. केंद्र सरकारद्वारे या योजनेत द्वितीय आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आलं आहे. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना सूचिबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. यादीतील कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना देखील या योजनेअंतर्गत फायदा होणार असून, त्यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य असणार आहे. साधारण तेराशे आजारांच्या वर या योजनेमार्फत पाच लाखांपर्यंत कॅशलेस उपचार होणार आहेत. केंद्र शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही सरपंच गौरी गायकवाड यांनी दिली.
या वेळी हवेली पंचायत समितीचे सदस्य अनिल टिळेकर, चित्तरंजन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नासिर पठाण, सचिन दाभाडे, सविता साळुंके, माधुरी काळभोर, रुपाली कोरे, ज्ञानेश्वर नामुगडे, प्रसाद कदम, दीपक काळभोर व कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : २८ कदमवाकवस्ती विमाकवच कार्ड वाटप
फोटो ओळ : विमाकवच कार्डचे वाटप करताना पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर,सरपंच गौरी गायकवाड, चित्तरंजन गायकवाड.
===Photopath===
280621\28pun_9_28062021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक : २८ कदमवाकवस्ती विमा कवच कार्ड वाटपफोटो ओळ : विमा कवच कार्डचे वाटप करताना पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर,सरपंच गौरी गायकवाड, चित्तरंजन गायकवाड