चाकण वनविभागाकडून रेस्क्यू टीमच्या सदस्यांना किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:09 AM2021-04-17T04:09:53+5:302021-04-17T04:09:53+5:30

या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, वनपाल नितीन खताळ, वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष धनंजय शेवकरी, कार्याध्यक्ष मनोहर शेवकरी, सचिव ...

Distribution of kits to rescue team members from Chakan Forest Department | चाकण वनविभागाकडून रेस्क्यू टीमच्या सदस्यांना किट वाटप

चाकण वनविभागाकडून रेस्क्यू टीमच्या सदस्यांना किट वाटप

Next

या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, वनपाल नितीन खताळ, वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष धनंजय शेवकरी, कार्याध्यक्ष मनोहर शेवकरी, सचिव प्रमोद बचुटे,सदस्य विशाल बारवकर,विकास गोरे,अतुल सवाखंडे,संतोष काटे, किशोर भुजबळ,रामेश्वर कुमावत,पायल गोरे, हितेश घुगरे,शांताराम गाडे,श्रीकांत साळुंखे, रत्नेश शेवकरी,प्रदीप तुळवे आदी रेस्क्यू टीमचे सदस्य उपस्थित होते.

वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी संगितले की, वन्यजीवांबद्दलचे समजामध्ये प्रबोधन, वन्यजीवांबद्दलची माहिती, प्रचार व प्रसार करणे, वृक्षारोपण करणे, वन-वणवा यावर नियंत्रण यासाठी या रेस्कू टीमची निर्मिती करण्यात आली आहे. वनपाल नितीन खताळ यांनी सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये लोकांनी कोणताही वन्य प्राणी आपल्या परिसरामध्ये आढळल्यास घाबरून न जाता वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.रेस्क्यू टीमच्या सदस्यांना ओळखपत्र व युनिफॉर्म मिळवण्यासाठी वसुंधरा बहुद्देशीय संस्था चाकण यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला.तसेच उपवनरक्षक जयरामे गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक एन. एस. पाटील जुन्नर यांच्या नियोजनातून तसेच चाकण वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी सहकार्य केल्याने रेस्क्यू टीमच्या सदस्यांना ओळखपत्र,युनिफॉर्म,बूट व कॅप देण्यात आली.

चाकण वन विभागाच्या वतीने रेस्क्यू टीमला युनिफॉर्म देण्यात आले.

Web Title: Distribution of kits to rescue team members from Chakan Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.