एक लाख रुपये किंमतीचे कोवीड प्रतिबंद साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:29 AM2020-12-15T04:29:24+5:302020-12-15T04:29:24+5:30

सेंटरच्या संचालिका डॉ.अंजली पलांडे ( देशमुख) यांनी पल्समिटर १, सॅनेटाइझर ( ५ लिटर)२० कॅन, मास्क ५००, कॉटन बंडल १०, ...

Distribution of Kovid banned material worth Rs. One lakh | एक लाख रुपये किंमतीचे कोवीड प्रतिबंद साहित्य वाटप

एक लाख रुपये किंमतीचे कोवीड प्रतिबंद साहित्य वाटप

Next

सेंटरच्या संचालिका डॉ.अंजली पलांडे ( देशमुख) यांनी पल्समिटर १, सॅनेटाइझर ( ५ लिटर)२० कॅन, मास्क ५००, कॉटन बंडल १०, सोडियम हायपोक्लोराईट (५ लिटर) ९ कॅन, फेसशिल्ड ५०,मोठे स्प्रे पंप २,स्प्रे बॉटल १० आदी साहित्य विद्या विकास मंदिरचे प्राचार्य दिलिप पवार यांच्याकडे सुपूर्द केले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इ.९ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविड या विषाणूजन्य रोगाची लागण होऊ नये म्हणून शाळेत येणारे शिक्षक व विद्यार्थ्यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर वर्ग सुरु करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच कोविड या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य यामध्ये देण्यात आलेले आहे. डॉ.अंजली यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेल्या साहित्य स्वरुपातील देणगी बद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त केले आहे.

--

फोटो १४ रांजणगाव गणपती

फोटो : निमगाव म्हाळुंगी येथील शिक्षण संस्थेला साहित्य भेट देण्यात आले.

Web Title: Distribution of Kovid banned material worth Rs. One lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.