बेलवाडीत विद्यार्थ्यांना कोवीड सुरक्षा साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:50+5:302020-12-11T04:28:50+5:30

चालु झालेल्या ९ ते १२ पर्यंतच्या शाळा पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी सणसर - लासुर्णे जिल्हा परिषद गटातील बेलवाडी ...

Distribution of Kovid safety materials to students in Belwadi | बेलवाडीत विद्यार्थ्यांना कोवीड सुरक्षा साहित्य वाटप

बेलवाडीत विद्यार्थ्यांना कोवीड सुरक्षा साहित्य वाटप

Next

चालु झालेल्या ९ ते १२ पर्यंतच्या शाळा पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी सणसर - लासुर्णे जिल्हा परिषद गटातील बेलवाडी बिट केंद्रातील २ हजार ८५ विद्यार्थ्यांना कोवीड सुरक्षा साहित्याचे वितरण इंदापूर पंचायत समितीचे मा.सभापती करणसिंह घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्या राज्यसरकारने इयत्ता ९ वी ते १२ पर्यंतचे शालेय शिक्षण घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.तर जानेवारी पासून पाचवी ते आठवी पर्यंतच्या वर्गांना परवानगी देण्यात येऊ शकते. असे असले तरी राज्यात कोरोनाची दुसरी लाट उंबरठ्यावर असल्याचे विविध स्तरातून व्यक्त होत असल्याने कोवीड पासून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटात पुणे जिल्हा परिषद कॅश कार्ड योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य सागर भोसले,पंचायत समिती सदस्य

अँड. हेमंत नरुटे व करणसिंह घोलप यांच्या प्रयत्नातून बेलवाडी बिट केंद्रातील १४ जिल्हा परिषद शाळा व मान्यताप्राप्त खाजगी शाळांमधील २ हजार ८५ विद्यार्थ्यांना कापडी मास्क, पाच थर्मल गन, पाच ऑक्सिमीटर,पाच सॅनिटाझर स्टँड व साडे बारा लिटर सॅनिटाझर याचे वितरण इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती मा. करणसिंह अविनाश घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे भवितव्य विचारात घेऊन या तीनही राज्यकारण्यांनी जबाबदारी व सामाजिक जाणीव म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने विद्यार्थ्यांच्या पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक रमेश मचाले व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

--

Web Title: Distribution of Kovid safety materials to students in Belwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.