राज्यभरातील ९२ पैकी ८१ विकलांग व्यक्तींना हात-पाय वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:40+5:302021-06-17T04:07:40+5:30
राजगुरूनगर येथे मुंबई माता बालसंगोपन केंद्रातील धर्मदाय रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, रोटरी क्लब राजगुरूनगर, भारत विकास परिषद, ...
राजगुरूनगर येथे मुंबई माता बालसंगोपन केंद्रातील धर्मदाय रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, रोटरी क्लब राजगुरूनगर, भारत विकास परिषद, मुंबई माता बालसंगोपन केंद्र यांच्या संयुक्त माध्यमातून मोफत पाय-हात आणि कॅलिपर्सचे शिबिराचे दि. १४ मार्च २०२१ रोजी आयोजन करण्यात होते. या तपासणी शिबिरात राज्यभरातील १०१ लाभार्थींची तपासणी करून त्यातील ९२ लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. ८१ लाभार्थींना १०-१० चे गट तयार करून वाडारोड येथील मुंबई माता बालसंगोपन केंद्रात वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी प्रकल्पप्रमुख अविनाश कोहिनकर, मंगेश हांडे, राजगुरूनगर रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल वाळुंज सेक्रेटरी चक्रधर खळदकर, अविनाश कहाणे, अजित वाळुंज, जयंत घोरपडे, नरेश हेडा, श्रीकांत गुजराथी, विठ्ठल सांडभोर, संतोष चौधरी, पवन कासवा, गणेश घुमटकर, दत्ता रुके, सुधीर येवले, अनिल थोरात, भारत विकास परिषदेचे केंद्रप्रमुख विनय खटावकर, विभाग संयोजक जयंत जस्ते, वासुदेव कालरा, विजय गोरे, प्रशांत सातपुते, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्षा मनीषा टाकळकर, सुनील वाळुंज, कैलास दुधाळे उपस्थित होते.
रोटरी क्लबच्यावतीने मोफत विकलांग (दिव्यांग) व्यक्तींना कृत्रीम हात पाय वाटप करण्यात आले.