‘लोकमत सरपंच अवार्ड्स’चे सोमवारी होणार थाटात वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 02:34 AM2019-03-10T02:34:59+5:302019-03-10T02:35:15+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता; मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा
पुणे : संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवार्ड्स’चे सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता येरवडा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
गेल्यावर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘लोकमत सरपंच अवार्ड्स’च्या दुसऱ्या पर्वाला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. १३ क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींनी पुरस्कारासाठी याही वर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले होते. या सर्व अर्जांची ‘लोकमत’च्या पुण्यातील मुख्य कार्यालयात बुधवारी झालेल्या ज्युरी मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण्यात आली. गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाºया व त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी झटणाºया मेहनती व कर्तबगार विजेत्या सरपंचांना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, बीकेटी टायर्स अॅग्री सेल्सचे राज्याचे प्रमुख झुबेर शेख, डिस्ट्रीब्युटर कंवरजित सिंग बंगा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांना ‘लोकमत सरपंच अवार्ड्स’ या कार्यक्रमाचे मुुख्य प्रायोजक हे बीकेटी टायर्स, तर पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक आहेत. सलग दुसºया वर्षीही या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पुरस्कारासाठी प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.
तज्ज्ञ ज्युरींनी केली अर्जांची छाननी
सर्व अर्जांची तज्ज्ञ परीक्षकांकडून छाननी करण्यात आली आहे. नॅशनल फेडरेशन फॉर अर्बन बँक्स अँड के्रडिट सोसायटीचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि राज्याचे माजी कृषी आयुक्तउमाकांत दांगट या तज्ज्ञांनी सर्व अर्जांची बारकाईने पाहणी केली. काही सरपंचांशी थेट संपर्क साधून त्यांनी प्रश्नही विचारले. याद्वारे त्यांनी १३ क्षेत्रातून विविध सरपंचांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकष
जलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरणसंवर्धन, प्रशासन /ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर या १३ क्षेत्रांत हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचांनी केलेले काम पाहून, त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जाणार आहेत.
पुरस्कार प्रदान सोहळा
सोमवार, दि. ११ मार्च २0१९ रोजी सायंकाळी ४.३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, येरवडा, गुंजन थिएटरजवळ होणार आहे. अधिक माहितीसाठी गणेश गंगाळे यांच्याशी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० पर्यंत संपर्क साधावा. मो. क्र.८८८८७५८६७६