कोविड केअर सेंटरला गाद्या, उश्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:00+5:302021-05-11T04:10:00+5:30
भोर शहरातील रामबाग येथील स्काउट गाईड मधील नव्याने सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटरसाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले यांच्या वतीने ...
भोर शहरातील रामबाग येथील स्काउट गाईड मधील नव्याने सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटरसाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले यांच्या वतीने बेडशी,उश्या देण्यात आल्या
कोविड सेंटरचे उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, रामचंद्र आवारे, महेंद्र बांदल, सारंग शेटे, दत्ताञय गरुड, संजय कोचळे, जगदीश घोणे, संजय निकम, दीपक राऊत, विकास बोडके उपस्थित होते.
कोविड सेंटरला सावले यांनी स्वखर्चातून ३० गाद्या आणी ३० उश्या दिल्या आहेत. यापूर्वी फळे औषधाचे वाटपही केले असून अजूनही मदत करण्याचे आश्वासन दिले.
विसगाव-चाळीसगाव खोरे येथील नेरे उपकेंद्रात येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर प्रमाणात असून, लसीकरण पुरवठा कमी आहे. या विषयावर अनिल सावले यांनी राजेंद्रकुमार जाधव (प्रांत भोर) यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कमुळे कोविड लसीकरणाचे रजिस्ट्रेशनला अडचणी निर्माण होत येत आहेत. त्यामुळे ऑफलाईन लस मिळावी अशी विनंती केली. तर नेरे येथील उपकेंद्रात डॉक्टरांच्या ढिसाळ कारभाराची माहिती दिली. याबाबत प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव यांनी ४५ वर्षांवरील लसीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.