कोरोना रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:47+5:302021-06-03T04:08:47+5:30
येथील इंदापूर तालुक्याचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन अशोक सपकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ...
येथील इंदापूर तालुक्याचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन अशोक सपकळ यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवाडी येथील रुग्णांना आहाराचे वाटप करण्यात आले. कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक आहार देऊन इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आणि श्रीराम सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष युवा नेते रोहन थोरात मित्र परिवाराचे काम कौतुकास्पद असून दिशादर्शक आहे, असे मत ग्रामविकास अधिकारी मृगेंद्र करचे यांनी व्यक्त केले.
आरोग्य सेवक हनुमंत मारकड यांनी स्वागत केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल धोतरे, आरोग्य सेवक हनुमंत मारकड, संजय तुपे यांच्याकडे खजूर, संत्री, पाण्याची बाटली, पौष्टिक पदार्थ कोरोनाग्रस्तांना देण्यात आले. या वेळी रोहन थोरात, सागर पवार, तुकाराम देवकाते, जोतीराम जामदार, अमोल शिर्के, संकेत पवार, शुभम जामदार, संदीप शिंदे, रोहन काटे, अक्षय पवार, भागवत पवार, यशराज माने आदी उपस्थित होते.
बेलवाडी येथील कोविड रुग्णांना पूरक आहाराचे वाटप करताना पदाधिकारी.
०२०६२०२१-बारामती-०३