पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 08:48 PM2024-05-12T20:48:18+5:302024-05-12T20:52:40+5:30
जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा धंगेकरांनी घेतला आहे.
पुणे: सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचे सांगत सहकारनगर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.
जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा धंगेकरांनी घेतला आहे.
"घराघरात पैसे वाटले जात आहेत. मी इथंच बसून राहणार रात्रभर, तुम्ही काही करत नाही. ते रात्रभर पैसे वाटून मोकळे होतील. तो निवडणूक आयोगाचा माणूस कुठंय? इथं लोकशाहीत असं घडतंय. तुमचा माणूस कुठंय? हा तिकडं पैसे वाटले जात असताना तुमचा एकही माणूस नाही. मी इथून उठणार नाही. तुम्ही तातडीने कारवाई करा - रवींद्र धंगेकर"