दहा सोसायट्यांच्या माध्यमातून १२ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:25+5:302021-05-20T04:10:25+5:30

टाकळी हाजी येथील पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून टाकळी हाजी, वडनेर, चांडोह, डोंगरगण, निमगाव दुडे, माळवाडी, रावडेवाडी, फाकटे, ...

Distribution of peak loans of Rs. 12 crore through ten societies | दहा सोसायट्यांच्या माध्यमातून १२ कोटींचे पीककर्ज वाटप

दहा सोसायट्यांच्या माध्यमातून १२ कोटींचे पीककर्ज वाटप

Next

टाकळी हाजी येथील पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून टाकळी हाजी, वडनेर, चांडोह, डोंगरगण, निमगाव दुडे, माळवाडी, रावडेवाडी, फाकटे, म्हसे, साबळेवाडी या दहा सोसायट्यांमधील एक हजार १५० शेतकऱ्यांना सुमारे एक हजार ६९० हेक्टर खरीप पिकांसाठी १२ कोटी ५० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. हे पीककर्ज तीन लाख रुपयांपर्यन्त शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होते .शेतकऱ्यांना सहज व सुलभ पद्धतीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बॅकेचे शाखा अधिकारी राजेंद्र चाटे, विकास अधिकारी मनोज बोखारे, तसेच संस्थेचे सचिव गणेश हिलाल, किशोर पडवळ, देवराम गुलदगड, राजेंद्र राजगुरु, कुशाभाऊ जोर, ईश्वर राजगुरू यांनी चांगल्या पदधतीने नियोजन करीत १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यन्त वाटप करण्यात आले .

सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कोरोनोकाळात गर्दी न होऊ देता वेळेत पीककर्ज वितरण पूर्ण केल्याबद्दल जिल्हा बॅकेचे संचालक माजी आमदार पोपटराव गावडे यांनी कौतुक केले.

Web Title: Distribution of peak loans of Rs. 12 crore through ten societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.