महिलांना पेरूंच्या झाडांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:10 AM2021-09-27T04:10:44+5:302021-09-27T04:10:44+5:30
शेतकरी महिला आपल्या शेताच्या बांधावर पेरूची रोपे लावणार आहे. या माध्यमातून पेरूंच्या उत्पादनातून पेरू प्रक्रिया, ग्रामीण प्रक्रिया उद्योगातून आत्मनिर्भर ...
शेतकरी महिला आपल्या शेताच्या बांधावर पेरूची रोपे लावणार आहे. या माध्यमातून पेरूंच्या उत्पादनातून पेरू प्रक्रिया, ग्रामीण प्रक्रिया उद्योगातून आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने वाटचाल केली जात आहे. चाकण परिसरातील टी अँड एल कंपनीच्या सीएसआर फंडातून ही पेरूच्या झाडांचे वाटप करण्यात आले. सभापती अरुण चौधरी, उपसभापती चांगदेव शिवेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य अंकुश राक्षे, सुनीता सांडभोर, सुभद्रा शिंदे , सरपंच संजीवनी थिगळे, अजय चव्हाण, रेखा थिगळे आदी उपस्थित होते. या तीन हजार ८०० पेरूंच्या रोपवाटपाचे नियोजन पंचायत विस्तार अधिकारी सुभाष भोकटे, सांख्यिकी विस्तार अधिकारी अनिता ससाणे, अभियान व्यवस्थापक लतिका भालेराव, प्रभाग समन्वयक शिवाजी तेलंगे, आम्रपाली पाटील, अभिजित माळवदकर, स्वाती थिगळे यांनी केले होते.